आधुनिक वैद्यकीय शास्त्राद्वारे स्त्रियांना मातृत्व सुखाचा सर्वोच्च आनंद मिळवून देण्याचे कार्य कौतुकास्पद : राजश्रीताई घुले

साईदीप हॉस्पिटल वंधत्व निवारण व प्रसूति विभागाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

                      निसर्गाने फक्त महिलेलाच मातृत्वाची संधी दिली आहे. माता होणे हे स्त्री जीवनातील परमोच्च सुख आहे.  काही वेळा अनेक व्याधींमुळे वंध्यत्व येते. अशावेळी निराश झालेल्यांना आधुनिक उपचार प्रणालीमुळे दिलासा मिळु शकतो ‌  वेळीच अचूक निदान व  उपचार केल्याने शेकडो महिलांना मातृत्व लाभत असते. साईदीप हॉस्पिटल  येथील डॉ वैशाली किरण, डॉ कस्तूरी कुरहड़े व त्यांच्या सहकारी डॉक्टर्स  आत्यधुनिक वंधत्व निवारण सेंटरद्वारे अनेकांची अपत्य प्राप्तीचे सुंदर स्वप्न साकारत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील यांनी केले.

 

 

 

 

                                 साईदीप हॉस्पिटल मधील वंधत्व निवारण व प्रसूति विभागाला दोन वर्ष पूर्ण होउंन तिसऱ्या वर्षात पदार्पण झाले आहे. यानिमित्त हॉस्पिटलमध्ये बालगोपाळांचा  स्नेह मिलानाचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून राजश्री घुले बोलत होत्या. यावेळी बालरोग तज्ञ डॉ. अनिलकुमार कुर्हाडे, ,डॉ. व्ही.एन.देशपांडे, डॉ. किरण दीपक, डॉ. इकबाल शेख, डॉ अश्विन झालानी, डॉ.पायल धूत,डॉ. अनिल एकशिंगे आदी उपस्थित होते.

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

 

                                     डॉ. दीपक यांनी या विभागाची माहिती देताना सांगितले की, साईदीप हॉस्पिटल च्या निर्मितीवेळी वंध्यत्व निवारण विभाग  अत्यधुनिक पद्धतीने तयार करण्यात आला‌. आजच्या काळात अनेक कारणांमुळे दाम्पत्याला अपत्य प्राप्ती होत नाही. अशा लोकांसाठी जागतिक पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञान व उपचार याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. काळाची व नगर जिल्ह्याची गरज लक्षात घेता उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून वंधत्व निवारण विभाग सेवा देत आहे. दोन वर्षांच्या वाटचालीत शेकडो कुटुंबात चिमुकल्यांचे आगमन झाले हे आम्हालाही कामाचे समाधान देणारे आहे.  त्याच प्रमाणे साईदीप हॉस्पिटलने सुमारे दहा हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले.  राज्यातील सर्वात कमी मृत्युदर साईदीप हॉस्पीटल आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

 

 

 

 

 

                            कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना डॉ‌.वैशाली किरण म्हणाल्या की, वंध्यत्व निवारण आय. व्ही. एफ. विभागामुळे शेकड़ो महिलांच्या जीवनात संतती सुख आणण्यात यश मिळाले. मुलबाळ होणार नाही अशी आशा सोडून दिलेल्या अनेक महिलांचे समुपदेशन करून त्यांची तपासणी व उपचार केली. अल्प दरात त्याना त्यांचे स्वप्न साकार करण्यात साईदीप हॉस्पिटल हे एक माध्यम ठरले याचा विशेष आनंद वाटतो. या वाटचालीत डॉ.किशोर नाडकर्णी, डॉ. पूजा नाडकर्णी, डॉ.प्रभाकर सिंग, डॉ. युवराज जडेजा यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे डॉ.वैशाली किरण यांनी सांगितले. कार्यमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी संजीव दायमा यानी केले. आभार प्रदर्शन डॉ. कस्तूरी कुर्हाडे यांनी केले या वेळी सौ ज्योति दीपक, सौ शोभा धूत, सौ सुनीता देशपांडे, सौ अनिता झालानी, सौ सीमा शेख व इतर  माता व मुले मोठ्या संखेने उपस्थित होते.