तिरुपती प्रसाद भेसळप्रकरणी एसआयटीची चौकशी स्थगित!
प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तपास थांबविण्यात आला आहे
तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडू प्रदासाच्या तुपामध्ये जनावरांची चरबी मिसळली असल्याच्या आरोपानंतर आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला आहे, अशी माहिती आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक द्वारका तिरुमला राव यांनी मंगळवारी दिली. संबंधित प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला आहे, असे राव यांनी सांगितले. प्रसाद बनविण्यासाठी जे साहित्य खरेदी करण्यात येते त्याची तपासणी आणि त्यांच्या नमुन्यांची चाचणी कशा पद्धतीने केली जाते याची माहिती एसआयटीमधील अधिकारी मागील दोन दिवसांपासून करत होते. लाडूमध्ये कशापद्धतीने भेसळ करणे शक्य आहे का आणि ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते याचा तपास एसआयटीचे अधिकारी करत आहेत.