पारनेर तालुक्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर – कोणत्या गावात कोणासाठी आरक्षित? वाचा सविस्तर! 

पारनेर तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीतील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण नुकतेच इंदिरा भवन येथे तहसीलदार गायत्री सौंदणे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाले.

📢
 पारनेर तालुक्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर – कोणत्या गावात कोणासाठी आरक्षित? वाचा सविस्तर! 🗳️

पारनेर तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीतील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण नुकतेच इंदिरा भवन येथे तहसीलदार गायत्री सौंदणे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर झाले.

🔹 खुल्या प्रवर्गासाठी:
टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, गोरेगाव, कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा यांसारख्या मोठ्या गावांमध्ये सरपंचपद सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुलं आहे.

🔹 महिला प्रवर्गासाठी आरक्षित:
सुपा, हंगा, वडनेर हवेली, मांडवे खुर्द, पिंपरी जलसेन, पिंपरी गवळी, चिंचोली, वडझिरे आदी गावं.

🔹 SC/ST व OBC प्रवर्गासाठी आरक्षण:
SC महिलांसाठी – पिंपळनेर, माळकूप, अस्तगाव
ST महिलांसाठी – भाळवणी, वडगाव आमली, गुणोरे
OBC महिलांसाठी – राळेगण थेरपाळ, भोंद्रे, कारेगाव, पळशी, कुरुंद आदी

📌 राजकीय वातावरण तापणार!
या आरक्षणामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इच्छुकांमध्ये चुरस वाढणार आहे. अनेक ठिकाणी सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे.

 

📣 तुमच्या गावाचं सरपंचपद कोणासाठी आरक्षित झालंय? आता राजकारणाचा नवा रंग दिसणार!