आमदारकीसाठी उर्मिला मातोंडकर कदाचित इकडून पण.. तिकडून पण..

उर्मिला मातोंडकर यांना आमदारकीची दुहेरी ऑफर येण्याची शक्यता

मुंबई :
 

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर  यांना शिवसेनेकडून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.

 

 महाविकास आघाडीनं संभाव्य यादीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केल्याचं वृत्त आहे.  त्यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार असल्याचं कळतं.
उर्मिला मातोंडकर  या अभिनय क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या नावाला राज्यपालांकडून आक्षेप घेतला जाण्याचीही शक्यता कमी आहे.  त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिलाशी चर्चा केल्याचं समजतं.  मात्र, उर्मिला  यांनी ही ऑफर स्वीकारली की नाही, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, ‘मी देखील अशी चर्चा ऐकतो आहे.  तो अधिकार मंत्रिमंडळाचा आणि मुख्यमंत्र्यांचा असतो.  उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे हे घेतील.  असं ते म्हणालेत .

 

हे हि वाचा – भविष्य निधि पेंशन धारकाना हयातीचा दाखला नुतनीकरण करण्यासाठी आव्हान

अहमदनगर येथील कर्मचारी भविष्य निधिसंगठन(.पी.एफ..)तर्फे सर्व सदस्यविधवा / विधुर, पेंशन धारकांना, दरवर्षाप्रमाणे 01 नोव्हेंबर 2020 पासून आपला हयातीचा  दाखला (Digital Life Certificate) संगणकिय पध्दतीने बनविण्याचे आव्हान केले जात आहे. हयातीचा दाखला बनविण्यासाठी पेंशन धारकांचे आधार कार्डमोबाईलपी.पी.नंबर आणि पेंशन  बँक पासबुक सह आपल्या पेंशन वितरित करणाया बैंकमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र” तयार करुन घ्यावे किंवा आपल्या जवळच्या सार्वजनिक सुविधा केंद्रामध्ये (CSC) आपले जीवन प्रमाणपत्र संगणकिय पध्दतीने तयार करावे. (जीवन प्रमाणपत्र  बनविण्याची माहिती खाली दिलेली आहे) जेणे करून आपली पेंशन सुरळीत पाणे मिळण्यास अडचण येणार नाही . जीवन प्रमाण पत्राची वैधता जीवनप्रमाणपत्र बनविण्यच्या तारखे पासून एक वर्षाची असेल. कर्मचारी भविष्य निधि संगठन (.पी.एफ..) क्षेत्रिय कार्यालय नाशिकच्या पेंशन धारकांनी पी.पी.नंबर संगणकामध्ये खाली दिलेल्या पध्दतीप्रमाणे टाकावे. KDNSK00XXXXXX किंवा KDNSK000XXXXX  या पध्दतीने भरावे.

 

कोविड -१९ साथीचा रोगापासून बचाव करण्यासाठी  शरीरिक  अंतरफेस मास्कचा वापर आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्य करा.

 

असे आव्हान श्री.अभिषेक कुमार मिश्र, सहायक भविष्य निधि आयुक्तजिल्हा कार्यालयअहमदनगर यांनी केले आहेतरी सर्व पेंशन धारकानी याची नोंद घ्यावी.

https://youtu.be/koemSj2SxR4