सांगली जिल्ह्यात १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री
सांगली जिल्ह्यात १ लाख ५० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले असून, त्यापैकी १ लाख पाच हजार टन बेदाण्याची विक्री झाली आहे. फेब्रुवारी ते दि. २० ऑक्टोबर पर्यंत सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौद्यात १ हजार २५० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सांगली जिल्ह्यात सध्या ४५ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. अगोदर कोरोना आणि त्यांनतर परतीच्या पावसामुळे शेतकरी पूर्ण पणे अडचणीत आला आहे .