शाडू मातीपासून बनवलेल्या मूर्तीचा वापर करावा :- शुभम निर्मळ
शाडू मातीपासून बनवलेल्या ७०० ते ८०० आकर्षक व सुबक गणेशमूर्ती.
ऋषिकेश राऊत
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
गणेशोत्सवाचे मांगल्य जपले जावे आणि पर्यावरणाचेही संवर्धन व्हावे, यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीपासून बनवलेले गणेश मूर्तींचे वापर करावा. असे आवाहन निर्मळ आर्ट्स चे शुभम निर्मळ व प्रतिक निर्मळ यांनी केले.
अहमदनगर मध्ये प्रथमच निर्मल आर्ट्स प्रस्तुत भव्य-दिव्य शाडू मातीपासून बनवलेल्या पेण येथील सुमारे ७०० ते ८०० आकर्षक व सुबक गणेश मूर्तींचा मॉल गव्हाणे हॉस्पिटल, प्रियदर्शन हॉटेल समोर, पाईपलाईन रोड, सावेडी येथे उपलब्ध आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींपासून निसर्गाचा होऊ नये यासाठी निर्मळ आर्ट्स येथे असणाऱ्या सर्व गणेश मूर्ती या शाडू मातीपासून बनवलेल्या असून त्यांचे कलरही हळद, गेरू, कुंकवाच्या रंगापासून बनवलेल्या मूर्ती आहेत.
आपण प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेश मूर्त्यांचे १० दिवस मनोभावे पूजन करतो, मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी त्या गणेश मूर्त्यांचे अक्षरशः विटंबना होते. गणेश मूर्तींचे विटंबन होऊ नये यासाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरेदी करावी व आपल्या घरच्या घरीच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असेही ते म्हणाले.
तसेच निर्मळ आर्ट्स येथे शाडू मातीच्या गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ द्वारे भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधीचा लाभ नगरकरांना घ्यावा. मात्र शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून मास्क सॅनिटायझर चा वापर करून नगरकरांनी गणेश मूर्ती खरेदी करण्याचा आनंद घ्यावा.