खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी : जिल्हाध्यक्ष जयंत वाघ
अहमदनगर (प्रतिनिधी): नांदेडचे खासदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांच्या दीर्घ आजारानंतर झालेल्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याची खंत काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी व्यक्त केली आहे. नांदेडसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमधला महत्त्वाचा दुवा निखळला. पक्षाचे ते मोठे संघटन कौशल्य असलेले नेतृत्व होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी भरीव असे सामाजिक आणि राजकीय कार्य केले. प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या सर्व चढउतारात ते एकनिष्ठ राहिले. लवकरच आपण चव्हाण कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी नांदेडला जाणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. पक्ष करण्यात त्यांच्या श्रद्धांजलीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. यांचे सोमवारी निधन झाले. हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसह नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यअंतर्गत जयंत वाघ आणि वसंतराव चव्हाण यांच्या भेटीगाठी होत असत, जयंत वाघ यांचे वडील रामनाथ वाघ यांचेही वसंतराव चव्हाण यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या वसंतराव चव्हाण यांनी सरपंच ते खासदार असा राजकीय प्रवास केला होता. तर वसंतराव चव्हाण १६ वर्षे विधानपरिषद आणि विधानसभेचे सदस्य होते. वसंतराव यांच्या कार्यकर्दीच्या आठवणींना उजाळा देत, अहमदनगर काँग्रेस कमिटी आणि वाघ परिवारातर्फे वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.