मतदार यादीत बाहेरील बाराशे नावे???

प्रभाग ९च्या प्रारूप यादीवर घेतला आक्षेप

अहमदनगर : महापालिकेच्या ‘प्रभाग ९क’ च्या एका जागेसाठी निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यात शेजारील ‘प्रभाग ८’ मधील  तब्बल बाराशे नावे घुसवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. मतदार यादीत बाहेरील बाराशे नावे या संदर्भात मनपाकडे हरकत ही दाखल झाली आहे. दरम्यान , एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभागाबाहेरील नावांचा समावेश झाल्याने हा राजकीय डाव असल्याची चर्चा सुरु झाली आहे. श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून मतदारयादी जाहीर करण्यात आलीय. या प्रारूप मतदार यादीत प्रभागाबाहेरील तब्बल बाराशे नावांचा समावेश झाल्याचा आक्षेप शादाब शेख यांनी केलाय. मनपाकडे त्यांनी रीतसर हरकत ही दाखल केलीय.

Also see this and subscribe

प्रभाग ९च्या यादीत समाविष्ट झालेली नावे  ही प्रभाग ८ मधील असल्याचे सांगितले जाते. त्यात ‘प्रभाग ८’ वर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. या प्रभागातील चारही नगरसेवक शिवसेनेचे आहेत. समाविष्ट झालेल्या मतदारांपैकी बहुतांश मतदार हे प्रभाग ८ मधील एका नगरसेवकाचे पारंपरिक मतदार असल्याचे बोलले जात असून, त्या माजी नगरसेवकाचे आणि विद्यमान नगरसेवकाचे नावही प्रभाग ९च्या यादीत आल्याने चर्चेला उधाण आले आहे. मतदार  एवढ्या मोठ्या प्रमाणात ही नावे प्रभाग ९ मध्ये समाविष्ट झाल्याने हा निवडणूक पूर्व राजकीय डाव असल्याची चर्चा ही मनपा वर्तुळात रंगली आहे. दरम्यान या नावांवर आक्षेप ही घेण्यात आला आहे.  

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.