इच्छुक असलेल्या १९६ जणांनी, ३७६ अर्ज घेतले विकत!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इच्छुक असलेल्या १९६ जणांनी ३७६ अर्ज विकत घेतले. शेवगावमधून ३ आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीने पहिल्याच दिवशी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर लगेच अर्ज वितरण आणि दाखल करून घेण्यास सुरुवात झाली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पहिल्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर १८ व्यक्तींनी ४६ अर्ज खरेदी केले. कर्जत जामखेड मतदारसंघात एका व्यक्तीने अर्ज दाखल केला, तर ९ व्यक्तींनी १८ अर्ज नेले आहेत. नगर शहर मतदारसंघात १८ व्यक्तींनी ३७ अर्ज खरेदी केले आहेत. अकोले मतदारसंघात आठ व्यक्तींनी आठ अर्ज नेले. श्रीगोंदा मतदारसंघ १९ व्यक्तींनी ३५ अर्ज घेतले आहेत. तर कोपरगाव मतदारसंघातून २७ व्यक्तींनी ३९ अर्ज खरेदी केले. पारनेर मतदारसंघातून आठ व्यक्तींनी १९ अर्ज घेतले. श्रीरामपूर मतदारसंघात सर्वाधिक २४ व्यक्तींनी ५६ अर्ज खरेदी केले आहेत. तसेच संगमनेर मतदारसंघात ११ व्यक्तींनी २५ अर्ज नेले. शिर्डी मतदारसंघात १४ व्यक्तींनी २३ अर्ज खरेदी केले. नेवासा मतदारसंघात २० व्यक्तींनी ४१ अर्ज घेतले आहेत. राहुरी मतदारसंघात २० व्यक्तींनी २९ अर्ज नेले आहेत. कर्जत, शेवगाव मतदारसंघ वगळता इतर १० मतदारसंघांत पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे.