“भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवला – प्रवरा नदी दुथडी भरून वाहणार!”
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरलाय!
सध्या भंडारदरा धरण ८७.९२% भरलेलं, आणि त्यातून ९२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. स्पीलवे गेट्स आणि संडव्यातून हे पाणी थेट प्रवरा नदीत सोडलं जातंय – त्यामुळे नदीचं पाणीपातळीत मोठी वाढ!
निळवंडे धरणही भरू लागलंय – ८८.४७% साठा पूर्ण झाला असून, त्यातूनही ७०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम २४x७ सिच्युएशन मॉनिटर करतेय.
महत्त्वाचं:
प्रवरा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं. नदीपात्राजवळ जाऊ नका. शेतीमाल, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा.
विसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे!
लक्षात ठेवा:
ही नैसर्गिक परिस्थिती असून, प्रशासन तुमच्यासोबत आहे. पण सावधगिरी हीच शहाणपणाची खूण!