८५० कोटींची फेज-3 पाणी योजना वर्षभरात सुरू होणार!
अहिल्यानगर : शहर विकासाच्या व्हिजन २०२९ ची मुहूर्तमेढ नववर्ष २०२५ मध्येच रोवणार असल्याची घोषणा आमदार संग्राम जगताप यांनी केली. सुमारे ८५० कोटींच्या फेज-तीन पाणी योजनेला सुरूवात करण्याचा प्रयत्न आहे. तसेच, सीना नदीवरील पूल पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे, वर्षभरात शहर खड्डेमुक्त करण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. आ. जगताप यांनी नवीन वर्षात शहर विकासाच्या कामाला गती देणार असल्याचे म्हटले आहे. शहराजवळ नवीन एमआयडीसीची जागा हस्तांतरित झाली आहे. त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती, रोजगार निर्मितीचाही प्रयत्न आहे. पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या मालकीची ६५० एकर जागा आहे. या जागेवर अम्युजमेंट घ पार्कची निर्मिती करणे, डीएसपी चौक आणि र सह्याद्री चौकातील उड्डाणपूलाच्या कामाला गै गती दिली जाईल. तसेच, शहराच्या ५५० कोटी य रुपयांच्या विकास आराखड्यास मागील सरकारच्या काळातच मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी दीडशे कोटींच्या निधीतून अनेक प्रमुख ‘रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. शहरासाठी ६६ किमी लांब फेज-३ पाणी योजनेसाठी ८५० कोटींच्या निधीस तत्वतः मान्यता मिळाली आहे. हे काम नववर्षात सुरू होणे अपेक्षित असल्याचे आ. जगताप म्हणाले. तसेच, गंजबाजार भाजी मार्केटची नवनिर्मिती करून सावेडी व केडगाव येथे अद्ययावत भाजी मार्केटची उभारणी करण्याचे नियोजन आहे. सारसनगर, गंगा उद्यानाच्या धर्तीवर केडगाव येथेही अद्ययावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणार असल्याचे ते म्हणाले.