उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलाय का उद्धव ठाकरेंवर राज्य आलाय-राज ठाकरे

राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना

उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, काल मला हा कोणीतरी विनोद पाठवला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं.  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल झूम मीटिंगद्वारे झालेल्या चर्चेचा तपशील पत्रकार परिषदेत सांगितला.  राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या. यामध्ये  दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून 2-3 दिवस दुकानं उघडण्यासाठी सूट द्या, खेळाडूंना जीम, स्वीमिंग पूलमध्ये सवलत द्या, बँकाची जबरदस्ती वसुली थांबवा अशा विविध मागण्या केल्या.यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणले की मला कोणीतरी हा विनोद पाठवला की उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलाय का उद्धव ठाकरेंवर राज्य आलाय .

 

*राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना*

माझ्याकडे अनेक तक्रारी आणि सूचना आल्या होत्या, त्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. काही सूचना केल्या

उत्पादनाबाबत – जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा. छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या

बँकांची जबरदस्ती – अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?

वीज बिल – सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे

व्यवसाय कर – जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना  सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं

कंत्राटी कामगार – लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतलं होतं, पण नंतर काढून टाकलं.. मी सूचना केली, त्यांना घ्या, तहान लागली की विहीर खोदणं योग्य नाही़

या सूचना योग्य आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळाशी बोलण्याचं आश्वासन दिलं.

जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी

स्वीमिंग पूल बंद ठिक आहे.. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.

सरकारची तिजोरी माहिती आहे- शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठं संकट येईल

शेवटची सूचना शाळा-  शाळा बंद आहेत, पण शाळांच्या फी तशाच आहेत. या शाळांना फी घेऊ नका, अर्धी घ्या किंवा काहीही…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा.. ते कोणत्या मानसिकतेत माहिती नाहीत.. ही पोरं तर लहान, कुठून अभ्यास करणार , कशा परीक्षा देणार, माहिती नाहीत

खालच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केलं, तसं दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकला.