नगर अर्बन को ऑप . बँक मतमोजणी पहिली फेरी
नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत सुवेंद्र गांधी यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे . १४ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते . सहकार पॅनल चा १४ उमेदवारांसह एकूण २१ उमेदवार रिंगणात होते .पहिल्या फेरीत सहकार पॅनल चा सर्वच उमेदवारांना प्रत्येकी जवळपास ३ हजार मते मिळाली . अपक्ष उमेदवारांना ५०० ते १०० दरम्यान मत मिळाली आहे .