पुण्यात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत
पुणे शहरात पुरसदृश्य स्थिती, तर ५ जणांचा मृत्यू
पुणे – राज्यात अनेक ठीकाणी पावसाचा जोर गेल्या दोन दिवसात वाढला आहे. मराठवाडा वगळता ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर, परभणी, धाराशीव, सांगली, कोल्हापुर, मुंबईसह कोकणात पावसाने हाहाकार माजवल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. पुणे शहर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरात पुर सदृश्य स्थिती निर्माण झाली असुन खडकवासला धरणातुन दुसऱ्या दिवशीही ४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे शहरातील नद्यांना पुर आला असुन बहुतांश सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असल्याने घरात अडकलेल्या सुमारे ४०० नागरिकांना बाटीच्या सहाय्याने बाहेर काढ्यात आले आहे. शहरात आपत्ती बचाव पथक, एनडीआरएफ लष्कर पुण्यात बचावकार्य करत आहे. तसेच १० जिल्ह्यातील शाळांना गुरुवार व शुक्रवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे दोन दिवस रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. तसेच खासगी कपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले असुन, मावळ मुळशीतील पर्यटण स्थळे ४ दिवस तर जिल्ह्यातील पर्यटण स्थळे दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. ताम्हिणी घाटात ५५६ मिमी पावसाची नोंद झाली तर लोनावळा परिसरात ३७० मिली पावसाची नोंद झाली आहे.
पावसामुळे दुर्देवी घटना
लवासा या आलिशान भागातील ३ बंगल्यांवर दरड कोसळून ढिगाऱ्याखाली ४ व्यक्ती अडक्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक शोध घेत आहे. तसेच चऱ्होली नदिपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे.
डेक्कन परिसरातील अंडाभुर्जीची पुरात वाहुन जावू नये म्हणून मध्यरात्री तीघेजण प्रयत्न करत होते या तीघांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. तसेच आदरवाडी परिसरात डोंगराचा एक कडा हॉटेलच्या ईमारतीवर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे.