मायावतीजींनी बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले -बाळकृष्ण काकडे
पक्ष बळकटीसाठी पदाधिकार्यांचा निश्चय
बहन मायावतीजींनी बहुजन समाज संघटित करुन सत्तेच्या माध्यमातून बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम केले. मात्र सध्या उत्तरप्रदेशसह देशात जातीयवादी सरकार सत्तेत असून, बहुजन समाजावर अन्याय, अत्याचार सुरु आहे. अन्यायाला वाचा फोडून धर्मांध शक्तीला चिरडण्यासाठी बहन मायावतीजींचा संघर्ष सुरु आहे. देशात धर्मनिरपेक्ष व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टी पर्याय म्हणून पुढे आला आहे. महाराष्ट्रात सत्तेसाठी बहुजन समाजाला वेठीस धरणार्यांना धडा शिकवण्यासाठी हा पक्ष विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांना स्वबळावर सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण काकडे यांनी केले.
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सिध्दार्थनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित विचारमंथन कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष काकडे बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनिल ओव्हळ, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मगर, जितेंद्र साठे, सचिव बाळासाहेब मधे, मच्छिंद्र ढोकणे, राजू शिंदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात जिल्हाप्रभारी संजय डहाणे यांनी बहन मायावतीजींच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज पार्टीने मागासवर्गीयांना आधार दिला. चार वेळा त्यांनी उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा सांभाळून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम केले. 1995 साली उत्तरप्रदेश राज्यातील निवडणुका जिंकून सत्ता स्थापन केली. त्यांनी एक नेता, एक मिशन व एक निशाण हा संदेश घेऊन काढलेली जम्मू ते काश्मीर सायकल रॅलीने सर्व बहुजन समाजाला ऊर्जा मिळाली. असल्याचे सांगून सध्या पक्षाच्या वतीने सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला. सुनिल ओव्हळ यांनी कांशीराम यांच्या विचाराने बहन मायावतीजींनी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचाराने राजकारणात योगदान देत आहे. त्या बहुजन समाजाला एका छताखाली आनण्याचे काम करीत असून, त्यांचे कार्य दिशादर्शक असल्याचे सांगितले.
यावेळी सिध्दार्थनगर परिसरात लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगर विधानसभेचे शहराध्यक्ष संतोष जाधव, प्रतिक जाधव, बाळू गायकवाड, संदीप वाघमारे, रंजित घोडेस्वार, विव्हान गायकवाड, आकाश गायकवाड, राजू पाटोळे, गणेश बागल, उमाशंकर यादव, कर्जत-जामखेडचे विशाल काकडे, अभिमान कांबळे, मनोहर खरात, श्रीगोंदाचे आत्तार शेख, संदीप चव्हाण, कचरु लष्करे, नितीन जावळे, शेखर अलहार, दत्तात्रय गोरखे, श्रीरामपूरचे जाकिर शहा, मच्छिंद्र ढोकणे, योगेश ससाणे, भारत त्रिभूवन, राहुरीचे संजय संसारे, किरण भोसले, पारनेरचे प्रगती साठे आदी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.