अहमदनगर सायकालिस्ट असोसिएशन ची भुईकोट किल्ला ते स्टेचु ऑफ युनिटी सायकल राईड यशस्वी

आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरात स्वातंत्र्य लढ्यासाठी १९४२ च्या चले जाव आंदोलनात सरदार वल्लभभाई पटेल यांना  नगरच्या भुईकोट किल्ल्यात अडीच वर्षे बंदिवासात ठेवण्यात आले होते . या घटनेला ७५ वर्ष झाले . स्वतंत्र भारताचे पाहिले गृहमंत्री , उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन चे सदस्य ” जमीन से असमान तक ” हा उपक्रम यशस्वी पणे पार केला . या उपक्रमात अहमदनगर चे 63 सायकलस्वार अहमदनगर चा भुईकोट किल्ला ते गुजरात येथील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ” स्टेचु ऑफ युनिटी ” चा  ५३५ किलोमीटर चा प्रवास ३ दिवसात सायकल वर पूर्ण केला.
११ नोव्हेंबर रोजी अहमदनगर सायकलिंग क्लब चे मा . गौरव फिरोदिया , स्काय ब्रिज चे मा . मुकेश छाजेड , लव्ह नगर चे मा नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झेंडा दाखवून या राईड ला सुरवात झाली . या राईड मध्ये १५ ते ७१ या वयोटातील युवक व महिला याचा समावेश असून एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित राईड करण्याची ही पहिलीच वेळ आहे . एकता , शारीरिक स्वास्थ्य चा संदेश देणारी ५३५ किलोमीटर चा प्रवास सायकल वर 3 दिवसात पूर्ण सायकल स्वारांनी पूर्ण केला . राईड अहमदनगर – आळेफाटा – नाशिक ( १ ला मुक्काम ) – वणी – सापुतारा वाजदा व्यारा ( २ रा मुक्काम ) मार्गे केवडिया ( ३ रा मुक्काम ) येथे १३ तारखेला ठीक ५:३० वाजता पोहोचली .या सामाजिक संदेश देणाऱ्या सायकल राईड ला महाराष्ट्र व गुजराथ पोलिसांचे खूप सहकार्य मिळाले . या राईड चे सर्व अपडेट्स अहमदनगर सायकलिस्ट या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम वर उपलब्ध असून अनेक आवाहनाचा सामना करत सायकलस्वार यांनी ही राईड अतिशय शिस्तीत पूर्ण केली . सायकलिस्ट असोसिएशन चे जेष्ठ सदस्य चंद्रशेखर मुळे यांनी या राईड चे आयोज केले असून मनोज येनगंदुल यांनी सर्व नियोजन पार पडले .
 अहमदनगर सायकलिंग क्लब , स्काय ब्रिज , आय लव्ह नगर , कॅमेल शाबुदाणा , क्लासिक पब्लिसिटी , साधना कोठारी , दत्ता पानसरे , मराठा सायकल सेंटर , चार्टर्ड अकाऊंटंट ग्रूप , सुराणा कॉर्नर , नेहा एजन्सी , सुपर्ब फिनिशर्स यांच्या आर्थिक सहकार्याने ही राईड यशस्वी पणे पार पडली . ही राईड यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमोल कुलकर्णी , केतन बलदोटा , सी . ए . प्रसाद भंडारी , नागेश धसाळ , नितीन पाठक , योगेश खरपुडे आर्थिक सहकार्याने ही राईड यशस्वी पणे पार पडली . ही राईड यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमोल कुलकर्णी , केतन बलदोटा , सी . ए . प्रसाद भंडारी , नागेश धसाळ , नितीन पाठक , योगेश खरपुडे तसेच कृष्णा भुतडा , अमित चित्ते , अथर्व अष्टपुत्रे आदी सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून या पुढील काळात आणि मुलांना सायकल ओढ लागावी उद्देशाने वेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रशेखर मुळे यांनी दिली त्याचबरोबर ज्या नवीन लोकांना नगर सायकलीस्ट चे सदस्य व्हायचे असेल त्यांनी 9404324632 किंवा 9423810365 या नंबर वर व्हॉट्सअॅप द्वारे नाव लिहून संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले .