आनंदनगर, आगरकर मळा या भागातील दूषित पाणीपुरवठा दोन दिवसात बंद झाला नाही तर त्याच पाण्याने आयुक्तांना अंघोळ घालणार

मनसेच्या नितीन भुतारे यांचा महानगरपालिकेला ईशारा

अहमदनगर पंधरा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे अनेक लोकांना दूषित पाणी पिण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे यामागे पाच ते सहावर्षापूर्वी देखील दुषितपाणी पुरवठ्यामुळे या भागात कावीळ ची साथ आली व त्या मध्ये दोन हजार लोकांना कावीळ होऊन दोन ते चार लोकांना जीव गमावावा लागला होता परंतु महानगरपालिकेकडून नवीन लाईन बसविण्यात आली याचे कारण सांगून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी एक दिवस लागेल दोन दिवस लागेल असं सांगत जवळपास वीस दिवस उलटले तरीही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे.


यासंबंधी मनसेचे नितीन भुतारे यांनी पाणीपुरवठा विभाग अभियंता रोहिदास सातपुते यांच्याशी तसेच सहाय्यक अभियंता राहुल गीते यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून दुषित पाणीपुरवठा बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आग्रही मागणी केली परंतु आजपर्यंत स्वच्छ पाणीपुरवठा झालेला नाही त्यामुळे आता जनतेचा संयम संपलेला असून यापुढे जर दोन दिवसात दूषित पाणीपुरवठा बंद झाला नाही व नळाद्वारे स्वच्छ पाणीआले नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच दूषित पाण्याने महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठ्याचे संबंधित अधिकारी अभियंता यांना आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा ईशारा समजावा दोन दिवसानंतर जर पाणीपुरवठा नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा झाला नाही तर त्या भागातील नागरिकांबरोबर महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनात येऊन आयुक्तांना, पाणीपुरवठ्याचे संबंधित अधिकारी, अभियंता यांना दूषित पाण्याने अंघोळ घालणार असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याप्रश्नी आक्रमक होणार आहे त्यामुळे त्वरित जर महानगरपालिकेचे अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर मोठा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न महानगरपालिकेमध्ये उद्भवू शकतो अशी परिस्थिती आहे इतक्या दिवस या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे हे समजत असताना देखील अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर शहराचे आमदार यांनी संबंधित भागाला भेट देखील दिली नाही हे एक दुर्दैव आहे या भागातील नगरसेवक मतदानाच्या वेळेस फक्त पैसे वाटायला येतात त्यामुळे त्यांच्याकडून या भागातील अश्या दुषित पाणीपुरवठा प्रश्ना कडे वारंवार दुर्लक्ष होते. शिवसेनेची महानगरपालिकेत सत्ता असून देखिल हा प्रभाग शिवसेनेच्या नगरसेवकांचा आहे तरी देखील येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांना जनतेच्या आरोग्याचे काही देणेघेणे फक्त मतदानाच्या वेळेस येऊन जनतेला खोटी आश्वासने द्यायची स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन द्यायचे असे सांगण्यात येते त्यामुळे या भागातील नागरिकांचा कोणावरही विश्वास राहिलेला नसून येणाऱ्या काळात मनसेच्या माध्यमातून संबंधित नागरिक महानगरपालिकेच्या दालनात आंदोलन करतील याची नोंद महानगरपालिकेने व पोलिस प्रशासनाने घ्यावी असे या निवेदनातून नितीन भुतारे यांनी सांगितले आहे संबंधित निवेदन अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले आहे.


त्यामुळे महानगरपालिका, आयुक्त, महापौर, आमदार, स्थानीक शिवसेनेचे नगरसेवक यांच्या समोर या आंदोलनामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या वर ताबडतोप महानगरपालिकेने दखल घेतली नाही तर मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे