उपक्रमशील व रणरागिनी अनिताताई काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान.

नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनामध्ये उपक्रमशील व रणरागिनी अनिताताई काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले अहमदनगर येथील जिल्हा परिषद शाळा भिस्तबाग येथील शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांना नांदेड येथे सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन हदगाव येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले त्यांच्या प्रशंसनीय कार्याचे उल्लेख संमेलन अध्यक्ष साहित्यिक सुभाष सोनवणे यांनी केले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महिला सक्षमीकरण बेटी बचाओ बेटी पढाओ, महिलांमधील आत्मविश्वास निर्माण व्हावा, पुढील पिढी आत्मविश्‍वास व सामाजिक भान असणारी तयार व्हावी यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून काळे यांचे प्रयत्न चालू असतात व राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन अनिता काळे हे जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक म्हणून अनेक वर्षापासून कार्य करत आहे. त्यामुळे त्यांची सामाजिक क्षेत्रामध्ये असलेली उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक सुभाष सोनवणे, मुंबई येथील आ.बाबुराव माने, इंजि.चंद्रकांत देगलूरकर, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष अनिता उतकर, नागोराव गंगासागर आदीसह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिता काळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.