एमआयआरसी मध्ये चोरी ,आरोपी अटक

अहमदनगर — सैनिकांचा वसाहतीतील बंद असलेल्या खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंगचा पट्ट्या त्यातील वायर चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले , हि घटना वैध कॉलनीसमोरील जकात नाका परिसरात घडली . या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सुभेदार नवनाथ भोसले यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे .
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघा अल्पवयीन मुलांनी एमआयआरसी मधील एका बंद खोलीचे  कुलूप तोडून आत प्रवेश केला . खोलीतील इलेक्ट्रिक  फिटिंग चा पट्ट्या उचकटून त्यातील विविध रंगांची ६ किलो वजनाची १८ हजार किमतीची  वायर चोरून नेली , या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला होता .  पोलिसांनी शोध घेतला असता एक अल्पवयीन मुलगा त्यांना मिळून आला परंतु दुसरा अलवयीन मुलगा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला .
 
पुढील तपास भींगार कॅम्प पोलीस ठाण्यातच हेड कॉन्स्टेबल राठोड करत आहेत .