कोणतेही क्षेत्र निवडा, पण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा

कोणत्याही क्षेत्रात मेहनत करावी लागते. त्या शिवाय यश मिळत नाही. परिस्थितीची जाणीव अन् व उ अभ्यास करावा. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा परंतु आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा, असा सल्ला तोफखाना पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सावेडीतील केशवराव गाडीलकर विद्यालय येथे आयोजित  व्याख्यानात गडकरी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे हे  होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे, महात्मा फुले एज्यूकेशन सोसायटीचे सचिव नामदेवराव गाडीलकर, मुख्याध्यापक बाबासाहेब शिंदे, मनीषा बनकर, संकेत शेलार शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक गडकरी  म्हणाल्या, विद्यार्थांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. व्हाॅट्सअप, फेसबुकवर खेळणे कमी करा,  तसेच मुलींनी न घाबरता पोलिस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवावी. शाळेतील सुविधा व राबवण्यात येत उपक्रमांचे त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले.  स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी अनेक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचेही कौतुक गडकरी यांनी केले.
स्नेहबंध चे अध्यक्ष शिंदे म्हणाले, जन्मतः च देव आपल्यात  सर्व कला गुण देवून पाठवितो. त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. विद्यार्थ्यांनी मेहनत करून मोठ्या पदावर जावे व आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे,असे सांगितले. सूत्रसंचालन जयश्री देशपांडे यांनी केले.