अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रदीपशेठ गांधी मार्ग नामकरण सोहळा संपन्न.

अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कोहिनुर ते इमारत कंपनी या रस्त्याचा प्रदीपशेठ गांधी मार्ग नामकरण सोहळा महापौर मा.सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मा.आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप , मा.श्रीमती निताताई प्रदीपजी गांधी यांचे शुभ हस्ते आणि उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले,
उद्योजक मा.श्री.नरेंद्रजी फिरोदिया,
सभागृह नेता मा.श्री.अशोक बडे महिला बालकल्याण समितीच्या सभापती मा.सौ.सौ.पुष्पाताई बोरुडे,उपसभापती मा.सौ.मीनाताई संजय चोपडा,माजी महापौर,सौ.सुरेखाताई कदम, मा.श्री.आण्णाशेठ मुनोत, मा.सुमतीलाल कोठारी मा.उपायुक्त श्री.श्रीनिवास कुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . यावेळी बोलताना आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप म्हणाले की अहमदनगरच्या सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रात स्व.प्रदीपशेठ गांधी यांचे कार्य निस्वार्थ होते.त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीने पुढे चालवावा,महान विचारांच्या व्यक्तींचे नावे रस्त्यांना,वास्तूंना देण्यामागे हाच हेतू असतो की त्यांचे विचार चिरंतन स्मरणात राहावेत.आजचा कार्यक्रम उत्साहाचा आहे कारण स्व.प्रदीपशेठ उत्साही व्यक्तीमत्व होते.
यावेळी बोलताना महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की स्व.
प्रदीपशेठ गांधी यांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी,पहिल्याच सभेत नामकरण प्रस्ताव मंजूर केला कारण महान व्यक्तिमत्व हा शहराचा ठेवा असतो तो जपणे महापालिकेचे काम आहे.
उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहराचे पर्यावरण अबाधित राहावे यासाठी आम्ही आयोजित केलेल्या प्रत्येक वृक्षारोपण उपक्रमात स्व.प्रदीपशेठ हक्काने हजर राहत असत शिवाय गेली पंधरा वर्षे न चुकता वृक्षारोपण कामा साठी ते आर्थिक मदत करीत.त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून शहरातील उद्यान अथवा मोठ्या वास्तूला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही श्री.गणेश भोसले यांनी केली.
मा.श्री.नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले की नावासाठी स्व.प्रदीपशेठ यांनी कधीच काम केले नाही.विदेशात पाहिलेल्या सर्व उत्तम गोष्टी आपल्या शहरात असाव्यात हे त्यांचे स्वप्न होते,गरजू,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे.शहर स्वच्छ असावे,उद्याने,शिल्प असावेत हे त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करू.
प्रास्तविक भाषणात रसिक ग्रुप चे अध्यक्ष मा.श्री.जयंत येलूलकर म्हणाले की स्व.प्रदीपशेठ गांधी अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते.अहमदनगर शहराची ओळख झालेला पाडवा महोत्सव हा स्व.प्रदीपशेठ यांच्या सहकार्याशिवाय होऊच शकला नसता.आपल्या शहराची सांस्कृतिक, अध्यात्मिक,सामाजिक वाटचाल अधिक गतिशील असावी यासाठी त्यांनी कायम आग्रही भूमिका निभावली त्यांच्या विचारांना,त्यांच्या कार्याला जतन करण्याचे काम पुढील काळात करू अशी ग्वाही श्री.येलूलकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला नामकरण फलकाचे मा.आ.श्री.संग्राम भैय्या जगताप,मा.श्रीमती निताताई गांधी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून  लोकार्पण करण्यात आले.सर्व मान्यवरांचा यावेळी श्री.नंदकिशोर आढाव,श्री.सागर कायगवकर, श्री.बाळासाहेब नरसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन श्री.निनाद तथा प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार माजी नगरसेवक मा.श्री.संजय चोपडा यांनी मानले. कोहिनुर ते इमारत कंपनी रस्त्याचे नामकरण व्हावे यासाठी माजी महापौर मा.सौ.सुरेखाताई कदम,मा.उपसभापती सौ.मीनाताई चोपडा,रसिक ग्रुपचे अध्यक्ष मा.श्री.जयंत येलूलकर मा.श्री.संजय चोपडा यांनी महापालिकेत पाठपुरावा केला .
कार्यक्रमास राष्ट्रवादीचे मा.प्रा.श्री.माणिक विधाते, महापालिका शहर अभियंता मा.श्री.सुरेश इथापे,अभियंता मा.श्री.श्रीकांत निंबाळकर, मा.श्री.अश्विन गांधी,सौ.श्वेता गांधी,श्री.किशोर मुनोत,श्री.मोहनशेठ मुनोत,श्री.ग्यानशेठ झंवर,श्री.पियुष मुनोत,श्री.चंद्रकांत पालवे,श्री.श्रीकांत मांढरे,श्री.नवनाथ वाव्हळ,श्री.सुदर्शन कुलकर्णी, महापालिका प्र. प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान व स्व.प्रदीप गांधी यांचा मित्र परिवार, व्यापारी वर्ग,तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके आणि सुंदर करण्यात आले होते.