गॅस कटरने स्टेट बँकेचे एटीएम फोडले

संगमनेर —चोरट्यांचा टोळीकडून संगमनेर तालुक्यात एटीएम ला टार्गेट केलं जात आहे . त्यामुळे एटीएम चा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . गुरुवारी  रात्रीचा सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घरगावचा शिवारात स्टेट बँक ऑफ  इंडिया चे एटीएम चोरटयांनी गॅस कटरचा साहाय्याने  फोडले असून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरटयांनी लंपास केली आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी कि , नाशिक -पुणे महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्टेट  बँक ऑफ इंडिया चे एटीएम आहे . गुरुवारी रात्रीचा सुमारास चोरटयांनी एटीएम ला टार्गेट करत गॅस कटर चा साहाय्याने फोडले . सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारून डीव्हीआर लंपास केला . व एटीएम मधून सुमारे १९ लाखांची रक्कम पळून नेली . असे बँकेचे शाखाधिकारी कांचन दाभाणे यांनी सांगितले.
घटना स्थळी घारगाव पोलिसांनी धाव घेतली असून तपासासाठी आसपास चा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज  ताब्यात घेण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलिसांनी  सुरु केला आहे .