चालकावर चाकू हल्ला करत ६० हजाराला लुटले

नगर — अनिकेत मच्छिन्द्र कडलग (वय २९, जावळेकडलग) या कर चालकाला तालुक्यातील कोची येथील घाटात दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी कारचा काचेवर अंडे फेकत चाकू हल्ला करून ६० हजाराला लुबाडले .  शुक्रवारी रात्री ९ वाजता हि घटना घडली .
कडलग ओमिनी कार घेऊन  मार्केटिंग चा व्यवसाय करतो . चोरटयांनी कडलग चा डोक्यात वजनदार वस्तू घातली , नंतर हातावर चाकूने वार केले . व यानंतर त्याचा जवळ असणारी साठ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली . कडलग चा फिर्यादीवरून अनोळखी तिघांवर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करीत आहेत .