जामखेड शहरात दरोडा टाकणारी टोळी जामखेड गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद

जामखेड प्रतिनिधी– शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी एस टी चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. मात्र काही दिवसातच सदर गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात जामखेड च्या स्थानिक गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. अशी माहिती कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी नुकतीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या बाबत अधिक माहिती अशी की दि २७ डिसेंबर २०२१ रोजी फीर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस टी ड्रायव्हर) रा. शिक्षक कॉलनी जामखेड यांच्या घरावर अज्ञात पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून व तलवारीचा धाक दाखवून घरातील बेडरुम मध्ये जाऊन कपाट तोडुन कपाटातील ९३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एवज चोरून नेला होता. या प्रकरणी एस टी चालक विजय खुपसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात पाच दरोडेखोरांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दरोड्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की या गुन्ह्य़ातील आरोपी नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार व त्याचा साडु व इतर साथीदार यांनी सदरचा दरोडा टाकला आहे. त्या अनुषंगाने मोठ्या शिताफीने नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार व जटा सुखलाल पारधी यांना तपासकामी दि ४ जानेवारी २०२२ रोजी ताब्यात घेतले आसता साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला आसल्याची कबुली दिली. तसेच आरोपी कोठे आहेत याची चौकशी केली असता ते आरोपी जामखेड मध्ये आले आहेत अशी खात्रीशीर माहिती जामखेड पोलीसांना मिळाली. त्या नुसार जामखेड पोलीसांनी दोन टीम करुन चार आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना हीसका दाखवताच गुन्हा कबुल करुन त्यांनी चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे जप्त केली.

या प्रकरणी जामखेड पोलीसांनी आरोपी नितीन ऊर्फ कव्या धनसिंग पवार रा. गोरोबा टॉकीज जवळ, हल्ली रा. पोखरी ता. आष्टी जिल्हा बीड, जटा सुखलाल पारधी रा. जमनीटोला. ता. सोहादपुर जिल्हा. होशिंगाबाद. राज्य मध्यप्रदेश, अक्षय ऊर्फ काळ्या लाखन पवार. रा. मिलिंदनगर, जामखेड ता. जामखेड, अनिल ऊर्फ लखन रतन ऊर्फ रवि काळे. रा. लिंपनगाव, ता. श्रीगोंदा, संतोष ऊर्फ बुट्ट्या कंठीलाल पवार, रा. खंडोबा वस्ती, जामखेड ता. जामखेड व सुरज कान्हु पवार, रा मिलिंदनगर, जामखेड, ता. जामखेड अशा सहा आरोपींना अटक करून त्यांच्या कडुन २० ग्रॉम सोने व गुन्ह्यात वापरलेले हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात या आरोपींन विरोधात अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आसल्याची देखील माहीती कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात पो. ना. अविनाश ढेरे, पो. कॉ. संग्राम जाधव, संदीप राऊत, विजय कोळी, आबा अवारे, अरुण पवार, संदीप आजबे सचिन देवढे यांच्या पथकाने केली आहे.