जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून नाना डोंगरे यांचा सत्कार

शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, आमदार लंके यांचे स्वीय सहाय्यक रामदास अडागळे, बाळासाहेब खिलारी, प्रदीप पाटोळे, पृथ्वी पाटोळे, गणेश साठे आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, गावाच्या विकासासाठी झटणारे पै. नाना डोंगरे सामाजिक योगदान देत आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य केले. छोट्याश्या गावात विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, कवी व युवकांचे संमेलनाचे घेतलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले