जोहारवाडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू .

पाथर्डी तालुकयातील जोहारवाडी  येथे एका अठरा वर्षीय तरुणीने विषारी पदार्थ सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला . सोमवारी रात्री हि घटना घडली . सविता ज्ञानदेव वांढेकर असे मयत तरुणीचे नाव आहे .  दरम्यान हि आत्महत्या कि घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे .  

जोहारवाडी  – खांडगाव  रस्त्याचा कडेला राहत असलेल्या ज्ञानदेव वांढेकर सोमवारी घराजवळील डाळिंबाचा बागेत काम करत होते . या वेळी घरात सविता एकटीच होती . सविता आई व भाऊ योगेश लग्नासाठी बाहेर गावी गेले होते , दरम्यान ज्ञानदेव याना घरातून कशाचा तरी आवाज आला . तेव्हा ते घराकडे आले .  यावेळी त्यांचा घरातून एक अज्ञात व्यक्ती पळून जाताना दिसला . पळून जाणारा व्यक्ती त्याची मोटार सायकल घरासमोरच सोडून गेला  यावेळी ज्ञानदेव यांनी घरात जाऊन पहिले तेव्हा त्यांची मुलगी सविता हिने विषारी पदार्थ पिल्याचे निदर्शनास आले . यावेळी सविता  हिला हॉस्पिटलला घेऊन जाताना वाटेतच तिचा मृत्यू झाला . दरम्यान तरुणीचा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मंगळवारी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला .