तलवारी सह गावठी कट्टा हस्तगत .

श्रीरामपूर शहर पोलिसांनी रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत एक गावठी कट्टा ,काडतूस व तलवार जप्त केली आहे , या कारवाईत दोघांना अटक झाली आहे .  वार्ड नं . १ गोंधवनी रोड , लबडे पेट्रोल पंपासमोर रात्री ११:५० वाजता इरफान सय्यद ला पकडण्यात आले .  त्याचा जवळून तलवार जप्त केली . कॉन्स्टेबल राहुल नरवडे यांचा फिर्यादीवरून इरफान वर गुन्हा दाखल करण्यात आला . तर दुसऱ्या घटनेत वार्ड नं २ सुलतान नगर भागात रात्री १२:१० चा सुमारास पोलिसांनी जोएब शेख यांच्याकडून सिल्वर रंगाची देशी बनावटीचा रिव्हॉल्वर व जिवंत काडतूस हस्तगत केला आहे .