तारखा देत देत चंद्रकांत दादांचे अडिच वर्षे झाली – आमदार रोहित पवार

जामखेड प्रतिनिधी—भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकित करत आसतात असे करता करता अडिच वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही देशात कुठल्या निवडणूका आल्या कि महाराष्ट्र सरकार विषयी बोलतात आता दहा मार्च सांगितले होते पण वर्षे सांगितले नव्हते अशी टिका आमदार रोहित पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली

दि. १४ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते आज दिघोळ, जातेगाव, मोहरी, तेलंगशी, धामणगाव, बांधखडक, काझेवाडी, रत्नापूर, कुसडगाव, अरणगाव, कवडगाव या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार बोलत होते.

अरणगाव येथील जिल्हा बँकेचे माजी संचालक सोले पाटील सह तेरा सेवा संस्थेच्या संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, देशात कुठल्याही राज्यात निवडणूका आल्या महाराष्ट्र सरकार पडणार असा जनतेत संभ्रम निर्माण केला जातो वास्तविक पाहता बिहार व उत्तरप्रदेश निवडणुकीचा आणी महाराष्ट्रातील राजकारणाचा काहीही संबध नाही महाराष्ट्राचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.