नगर अर्बन को ऑप . बँक मतमोजणी पहिली फेरी

नगर अर्बन को ऑप . बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे .सकाळी मतमोजणी ला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत सुवेंद्र गांधी  यांचा नेतृत्वाखाली सहकार पॅनल ने मोठी आघाडी घेतल्याचे समोर आले आहे . १४ जागांसाठी रविवारी मतदान  झाले होते . सहकार पॅनल चा १४ उमेदवारांसह एकूण २१ उमेदवार रिंगणात होते .पहिल्या फेरीत सहकार  पॅनल चा   सर्वच उमेदवारांना प्रत्येकी जवळपास ३ हजार मते मिळाली . अपक्ष उमेदवारांना ५०० ते १०० दरम्यान मत मिळाली आहे . 

 
श्री अजय अमृत बोरा ३१०४, श्री अनिल चंदुलाल कोठारी ३०५३, श्री ईश्वर अशोक उर्फ बाबूशेठ बोरा ३०९०, श्री गिरीश केदारनाथ लाहोटी २८४७, सौ .दीप्ती सुवेंद्र गांधी  ३०७३, श्री महेंद्र (भैय्या) मोहिनीराज गंधे २९७०  , श्री राजेंद्रकुमार आत्माराम अग्रवाल २८८०, श्री राहुल नरेंद्र जामगावकर २९१३ , श्री शैलेश सुरेश मुनोत ३०५७, श्री संपतलाल  धनराज बोरा २८८६.
श्री दीपक धनराज गुंदेजा  ११८५, श्री अनिल पांडुरंग गट्टाणी  ६२८,श्री संजय शिवाजी ढापसे  ४७७, सौ. स्मिता महावीर पोखरना ७११.