नगर तालुक्यात मोटारसायकलींच्या चोऱ्यांचे सत्र सुरू

नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले मोटारसायकल चोऱ्यांचे सत्र आता शहराजवळील नगर तालुक्यातील विविध गावांमध्येही सुरू झाले आहे . घरासमोर लावलेल्या मोटारसायकलींचीही चोरी जाऊ लागल्याने आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे .
नगर तालुक्यातील अरणगाव परिसरात असलेल्या शिंदे मळा येथे घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल ( एमएच १६ , जे . २२०७ ) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे . याबाबत बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे ( रा . वाळकी रोड , शिंदे मळा , अरणगाव ) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी अज्ञात असून , चोरट्याविरुद्ध भा . दं . वि . क . ३७ ९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे . मोटारसायकल चोरीची दुसरी घटना तालुक्यातील अकोळनेर
येथे घडली आहे , येथील टू – व्हीलर गॅरेजसमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटारसायकल ( एमएच १६ , एझेड ७८२६ ) चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी ( दि . २१ ) रात्री घडली . याबाबत प्रतीक विश्वनाथ खैरे ( रा . प्रिन्स कॉलनी , पाईपलाईन रोड , सावेडी ) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . भिंगार शहरातील शुक्रवार बाजार परिसरात असलेल्या शनी . मंदिरासमोर लावलेली रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल ( एमएच १६ , एबी ८८१३ ) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे . लाल याबाबत अंतोन शामसुंदर गायकवाड ( रा . कातोरे वस्ती , नागापूर एमआयडीसी ) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . या तीन घटनांप्रमाणेच मागील . तालुका कॅम्प आठवड्यातही नगर  पोलीस ठाणे , भिंगार पोलीस ठाणे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटारसायकली चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत .