पटवर्धन चौकात झाली घरफोडी

नगर : शहरातील पटवर्धन चौक परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या – चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे . याबाबत विवेक अच्युतराव लंके यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . विवेक लंके यांचा पटवर्धन चौक परिसरात जुना वाडा असून तेथे ते एकटेच राहतात . त्यांची पत्नी व मुलगा पुण्यात राहतात . लंके हे वाड्याला कुलूप लावून २३ डिसेंबर रोजी पुणे येथे मुलाकडे गेलेले होते . त्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या व इतर दागीने तसेच १० हजार रुपयांची रोकड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला . पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .