पद्मश्री पोपटराव पवारांसह शंभरहून अधिक जणांचे नोंदवणार जबाब . 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे  या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाचा तपास तांत्रिक मुद्यांभोवती फिरत असून त्याची व्याप्ती हि मोठी आहे . अजूनही तपासात पोलिसांना आगीचे ठोस कारण  काय हे समोर येत नाही . आग  लागली तेव्हा या ठिकाणी  पदमश्री पोपटराव पवार घटनास्थळी उपस्थित होते म्हणून त्यांच्यासह  शंभरहून अधिक लोकांचे जबाब नोंदवले जाणार आहे .


जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आणि या घटनेत जिल्हा शल्य चिकित्सक पोखरना यांच्यासह तीन परिचारिका याना निलंबित करण्यात आलं. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरण यांनी अटकपूर्व जामीन करून घेतला .तसेच वैधकीय अधिकारी सुरेश ढाकणे यांनी अटकपूर्व जामीन साठी न्यायालयात धाव घेतली होती .व  तिन्ही परिचारिका याना सुद्धा न्यायालयाने जामीन मंजूर केला  आहे .  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्राथमिक तपासात जिल्हा रुग्णलयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा चा खुलासा केला होता . पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यासंदर्भात तांत्रिक पातळीवर तपास  करत आहेत. तसेच प्रत्यक्ष दर्शींचे  जाब  घेतले असून हि प्रक्रिया अतिशय किचकट स्वरूपाची असल्याची माहिती मिटके  यांनी दिली.