पोलिस कर्मचाऱ्यास तीन दिवस कोठडी

अहमदनगर : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार करणारा श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी तुळशीराम वायकर यास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने जेरबंद केले आहे . न्यायालयासमोर हजर केले असता , त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली . श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी वायकर याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे . त्यानुसार आरोपी वायकरविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणे , तसेच अनुसूचित ” जाती – जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता . पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्याकडे याचा तपास होता . त्यांच्या पथकाने वायकरचा ठावठिकाणा शोधून त्यास अटक केली .