फुले ब्रिगेड च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिवसन्मान सोहळा.

अहमदनगर (प्रतिनिधी) –  महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाजासमोर आणले. त्यांनी शिवजयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास सुरुवात करून जनमानसातील त्यांची प्रतिमा उंचावली या राष्ट्र पुरुषांनी समाज उन्नतीचे काम केले आहे. हेच कार्य पुढे सुरू ठेवले पाहिजे समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांसाठी कार्य करावे. फुले ब्रिगेड च्या माध्यमातून राष्ट्रपुरुष यांच्या कार्याचा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. शिवजयंतीनिमित्त फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ शिव सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे कार्य अध्यक्ष अभिजित खोसे, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ.सुदर्षण गोरे, डॉ. योगेश चिपाडे, उद्धव बडे, किरण जावळे, महेश सुडके, महेश गाडे, प्रसाद बनकर, स्वामी शेलार, महेश सुडके, अंकुश पडोळे, गणेश जाधव, स्वप्निल पडोळे, आशिष भगत, विक्रम बोरुडे, स्वप्निल गायकवाड आदी उपस्थित होते.