बेलापूर येथील तरुणाची तरुणीकडून फसवणूक

श्रीरामपूर :  तरुणीने बेलापूर परिसरात राहणाऱ्या तरुणास मोबाईलवरून फोन करून त्याच्या बँक अकाउंटमधील ९९ हजार २७४ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे .
 तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणाऱ्या राऊत नावाच्या तरुणाच्या मोबाईलवर आराध्या शर्मा असे नाव सांगणाऱ्या तरुणीने तिच्याजवळील एका नंबरवरून फोन करून क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्यासाठी व्हेरिफिकेशन कॉल आहे , असे सांगून कॉल केला . तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सांगा , अशी बतावणी करून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन तरुणाची सुमारे ९९ हजार २७४ रुपयांची फसवणूक केली . याप्रकरणी औदूंबर राऊत या तरुणाने सायबर पोलिसात तक्रार दिली आहे .