भंगारातून केंद्र सरकारला मिळाला 62.54 कोटी रुपयांचा महसूल

अहमदनगर : मेट्रो न्यूज

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रालये  , विभागांमध्ये त्यांच्या सलग्न अधिनस्त कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .

यामध्ये सुमारे 6,154 कार्यालयांमधील 12.1 लाख चौ. फूट जागा रिकामी करून स्वच्छ करण्यात आली.

यामध्ये भंगाराची  विल्हेवाट लावून 62.54 कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्रसिंग यांनी स्वच्छता मोहिमेची माहिती दिली.