भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे धडे गिरवले. वर्षभर योग चळवळ चालविणार्‍या हरदिनच्या वतीने नागरिकांना व्यायाम व योग करण्याचे आवाहन करण्यात आले.
योगप्रशिक्षक प्रकाश देवळालीकर, हेमंत गोयल, विनोद मुथा यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर करुन विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी विविध आसने करुन निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, दीपक बडदे, मेजर दिलीप ठोकळ, विकास भिंगारदिवे, सचिन चोपडा, रामनाथ गर्जे, सुभाष गोंधळे, दिलीप गुगळे, सरदारसिंग परदेशी, रावसाहेब कोकणे, सर्वेश सपकाळ, संपत बेरड, एकनाथ जगताप, किशोर भगवाने, अशोक पराते, सुंदर पाटील, नामदेव जावळे, सुमेश केदारे, सिताराम परदेशी, धर्मराज संचेती, संतोष लुणीया, प्रीतम मुथा, विलास तोतरे, राजू कांबळे, विठ्ठल राहिंज, अभिजीत सपकाळ, माजिद शेख, प्रफुल्ल मुळे, राधेश्यामसिंग ठाकूर, संजयराव वाकचौरे, राहुल दिवटे, इवान सपकाळ, रतन मेहत्रे, बापूसाहेब तांबे, विनोद खोत आदी उपस्थित होते.

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, अनेक वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालविण्यात येत आहे. ग्रुपचे चारशेपेक्षा जास्त सदस्य असून, ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात. निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची आहे. योगने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश जाधव, अविनाश काळे, सदाशिव मांढरे, सूर्यकांत कटोरे, जालिंदर अळकुटे, किरण फुलारी, महेश सरोदे, नवनाथ खराडे, अशोक भगवाने, रमेश कोठारी, कुमार धतुरे, योगेश चौधरी, गोकुळ भांगे, रघुनाथ उबाळे, हरी शेलार, कैलास भिंगारदिवे, चंद्रकला येलुलकर, प्रांजली सपकाळ, उषाताई ठोकळ, मीनाक्षी खोबरे, वंदना मेहेत्रे, राजश्री राहिंज, कविता भिंगारदिवे, हिराबाई पांढरे, सुमनबाई भुजबळ आदींनी परिश्रम घेतले.