मराठवाडा मित्रमंडळचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांचा अमृत महोस्तवी गौरव सोहळा संपन्न

बालगंदधर्व रंगगमंदिरात रंगला सोहळा

पुणे दि. ४ नोव्हेंबर २०२३.
प्रतिनिधीः (ॲड.सत्यजीत कराळे पाटील): आज पुणे येथील बालगंधर्व रंगमंदीर येथे, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि वारकरी संप्रदाय यांचा संगम म्हणजेच मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांचा अमृत महोस्तवी गौरव सोहळ्याचा कार्यक्रम मा. प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर सुहृद मंडळ व मराठवाडा मित्र मंडळ पुणे च्या वतीने आयोजित केला होता.
या वेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष श्री. प्रतापराव पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे प्र-कुलगुरू डॅा. पराग काळकर तर, अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव गणगे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने प्रा. जाधव यांना स्मरणपत्र देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांचे आत्मचरित्र असलेल्या गोरव अंकाचे प्रकाशन श्री देगलुरकर सर व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी प्रा. जाधव यांना कोतुकाच्या शब्दांनी शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमास विविध स्तरांतील मान्यवर, आजी माजी विद्यार्थी, शिक्षक वृंद व इतर मान्यवर हजारोच्या संख्येंने उपस्थित होते.