महापालिका पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी

शहरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार ऋषिकेश बालय्या गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखान पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश गुंडला प्रभाग क्रमांक 9 क च्या पोटनिवडणुकीत उभे असून, ते 16 डिसेंबर रोजी निलक्रांती चौक, सिद्धीबाग परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना अज्ञात व्यक्तीने विनाकरण शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. गुंडला यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.