वीज कंपनीचे दोन कर्मचारी ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले .

वीज वितरण कंपनीचा जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्याने ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . बाळासाहेब पांडुरंग टीमकरे (तंत्रज्ञ वर्ग ३) व शिरीष रावसाहेब भिसे (मदतनीस) असे लाच स्वीकारत असताना पडलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत . आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हि घटना ३ जानेवारी रोजी घडली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हि कारवाई केली आहे .

या बाबत मिळालेली माहिती अशी कि पांढरी पूल येथे तक्रार दार व्यक्तीचे हॉटेल आहे . या हॉटेल चे बिल दरमहिन्याला कमी येईल अशी व्यवस्था कारून देतो या साठी उप कार्यकारी अधिकरी श्री कोपनर याना सांगून नियोजन करण्यात येईल . असे आरोपीने तक्रार दाराशी सांगितले . मात्र या प्रकरणी ७० हजारांची लाचेची मागणी केली असून तडजोड ६० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले गेले . शिवलीला भेळ सेंटर (पांढरी पूल )येथे तक्रार दाराकडून शिरीष रावसाहेब भिसे याने ६० हजारांची रक्कम स्वीकारून बाळासाहेब पांडुरंग टीमकरे यांचाकडे दिली . हा सर्व प्रकार सापळा रचून पकडण्यात आला .

पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांचा नेतृत्वाखाली पोनी . पुष्पा निमसे , संतोष शिंदे , रमेश चौधरी , विजय गंगूल, वैभव पांढरे , रवींद्र निमसे , संध्या म्हस्के , राधा खेमनर , हारून शेख , राहुल डोळसे यांचा पथकाने हि कारवाई केली .