शहरात तीन दिवसीय समता सैनिक दलाच्या शिबिराचा समारोप

जातीय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी जातीय अत्याचार रोखण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केली. या दलाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाचे संरक्षण करुन समाजावर होणारे हल्ल्यांचा बिमोड करण्यात आला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार वाढला असून, पुन्हा बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाची गरज भासत आहे. यासाठी गावा-गावात समता सैनिक दल उभे करुन शिबिर घेणार असल्याचे प्रतिपादन तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले.
समाजात वाढलेल्या जातीय अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी नवीन टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाच्या माध्यमातून समता सैनिक दलाचे तीन दिवसीय शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी कांबळे बोलत होते. यावेळी भन्ते प्रज्ञाशील, भन्ते शांतीप्रिय, नगरसेवक राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, अ‍ॅड.डॉ. संतोष गायकवाड, जेष्ठ नेते विजय भांबळ, किरण दाभाडे, रोहित आव्हाड, विवेक भिंगारदिवे, डॉ. भास्कर रनणवरे, शेखर पंचमुख, आकाश निरभवणे, दिपक लोंढे, अविनाश कांबळे, कृपाल भिंगारदिवे आदींसह बाल श्रामणेर व समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.
नगरसेवक राहुल कांबळे, किरण दाभाडे, विजय भांबळ, शेखर पंचमुख, विवेक भिंगारदिवे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन समाता सैनिक दलाचे आभार मानले. समाजाचे रक्षण करण्यासाठी समाजाला जागरुक व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट करुन या शिबिला सहकार्य करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.
समता सैनिक दलाचेचे प्रमुख दिपक अमृत यांनी समता सैनिक दलातील सैनिकाचे कार्य व आचरणाचे नियम व अटी सांगितले. सेवानिवृत्त मेजर बी.एम. कांबळे यांनी तीन दिवस सर्व शिबिरार्थींची परेडचा सराव करुन घेतला. या शिबिरासाठी आण्णासाहेब गायकवाड, किशोर कांबळे, शिवाजी भोसले, मिलिंद आंग्रे, विजितकुमार ठोंबे, वधुवर प्रमुख अशोक बागुल, अमर खुमने यांनी सेवा दिली.
शिबिरामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी होत्या.  शिबिर यशस्वी करण्यासाठी गौतमी भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, माया जाधव, सारिका गांगुर्डे, सविता कांबळे, मिरा सरोदे, साक्षी गांगुर्डे, मंगल पवार, आशा चांदणे, रंजना भिंगारदिवे, शोभा गाडे,  मनिषा कांबळे, वैष्णवी कांबळे, हर्शदा कांबळे, संजवनी बडेकर, जीवा कांबळे, विजितकुमार ठोंबे, मिलिंद आंग्रे, सचिन कांबळे, अविनाश बडेकर, श्रीकांत देठे, नरेश खडसे, श्रीकांत सरोदे, सुरज बोरुडे, दिपक गायकवाड, रंगनाथ माळवे यांनी परिश्रम घेतले. समारोपीय कार्यक्रामाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब गायकवाड यांनी करुन आभार मानले.