शिवभक्त सुनिल क्षीरसागर यांनी घरातच उभारलं अनोख शिवतीर्थ

नगर — छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकामध्ये पोहचावे म्हणून अहमदनगरच्या शिवभक्त सुनिल क्षीरसागर यांनी घरातच अनोख शिवतीर्थ उभारलंय. संपूर्ण क्षीरसागर परिवार वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य पूजा करतात. अहमदनगर शहरातील बोल्हेगाव येथील रहिवासी सुनील क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहचावे यासाठी क्षीरसागर परिवार यांनी घरातच अनोखं शिवतीर्थ उभारलं. या शिवतीर्थावर दररोज छत्रपती शिवाजी महाराजांची नित्य पूजा ,अभिषेक,आरती होते, तसेच महाराजांना नित्यनियमाने नैवेद्य अर्पण केला जातो. केवळ शिवजयंतीच्याच दिवशी शिवआराधना न करता वर्षाभर महाराजांचे विचार आचरणात यावे यासाठी संपूर्ण क्षीरसागर कुटुंब ही आराधना करतात.