सनफार्माला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्लांटचे नुकसान

नगर शहरातील नागापूर एमआयडीसीततील सन फार्मा कंपनीच्या एका प्लांटला बुधवार रात्री नऊच्या सुमारास अचानक आग लागली. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला ही आग लागली होती. ही नेमकी कशामुळे लागली हे उशिरा पर्यंत समजू शकले नाही.
यावेळी त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. आग विजवल्या नंतर त्याचा मृतदेह तेथून हलवण्यात आला.सन फार्मा या कंपनीला लागलेली आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत.
याच प्रकल्पाशेजारील रुमला प्रथम आग लागली असून ती कंपनीत पसरली होती.आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले होते. काही तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल करण्यात आल्या होत्या.
सात नंबरच्या प्लांट जवळ दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुसरा कर्मचारी सुखरूप असल्याचे समजते. दरम्यान आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहायक निरीक्षक युवराज आठरे फौजफाट्यासह दाखल झाले आहेत. त्याचबरोबर महापालिकेचे विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांनी देखील कंपनीत धाव घेतली. एमआयडीसी, अहमदनगर आणि राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम केले