जुने बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉपचे जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या शाखेचे उद्घाटन.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी माळीवाडा बस स्टॅन्ड येथे छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉपचे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या रिक्षा स्टॉप शाखेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे, उद्योजक अफजल शेख, सरचिटणीस अशोक औषिकर, कार्याध्यक्ष कॉ.बाबा आरगडे, प्रमुख सल्लागार विलास कराळे, सरचिटणीस लतीफ शेख, कामगार नेते भाऊसाहेब भाकरे, आप्पा तरटे, दीपक गांधी, गणेश पाटोळे, रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सागर लांडे, उपाध्यक्ष शब्बीर शेख, कार्याध्यक्ष एकनाथ शिंदे, गणेश कोंडके, निरंजन नामदेव, आशिष ताडला, सागर काजवे, निहित सोनवणे, इलियास बेग, राहुल ननवरे, रवी वाघचौरे, सुरज जगधने, शाकीर शेख, मतीन बागवान, गणेश परकाळे, राहुल बेरड, अमीन पठाण, सिराज शेख, किरण शिंदे, राकेश कोल्हारे, सोमनाथ बहिरवाडे, गणेश शेळके, विजय चौधरी आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते. प्रास्ताविकात अविनाश तात्या घुले म्हणाले की शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना नागरिकांना व शहरांमध्ये येणाऱ्या प्रवाशांना दळण-वळणाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट या रिक्षा स्टॉप च्या माध्यमातून सेवा पुरवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन यांनी केले तर आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहराची झपाट्याने वाढ होत असताना दळण-वळणासाठी नागरिकांना रिक्षा ची गरज भासते या रिक्षा स्टॉप मुळे माळीवाडा हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना रिक्षाची गरज भासत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या  प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी गरज भासत असल्याने प्रामाणिकपणे येथे सोय होणार आहे व कोरोना काळात महागाई वाढली त्यामुळे रिक्षाचालकांना फटका बसला आहे रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटीत राहण्याची देखील गरज आहे व रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ देखील लवकरात लवकर मार्गी लागणार असल्याची भावना व्यक्त केली.