समाजवादी पार्टीच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन.

एलसीबी च्या कारवाईचा सावळागोंधळ.

राहुरी येथे एलसीबी च्या पथकाने 21 डिसेंबर रोजी पवन ट्रेडर्स या दुकानात छापा टाकून गुटख्याची कारवाई करण्यात आली होती सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा साठा पकडण्यात आला हा साठा खाजगी वाहनातून नगरला आणत असताना चहाच्या दुकानावर सर्व घटना पाहात असून काही वेळाने संशयित कर्मचारी अधिकारी यांनी जप्त केलेला मुद्देमाल सदरच्या स्कार्पियो मध्ये भरून पोलीस स्टेशनला न नेता राहुरी शहराच्या जवळच एका घरामध्ये गाडीतील बराच जप्त केलेला गुटख्याचा मुद्देमाल घरात काढून ठेवून उर्वरित मुद्देमाल पोलिस स्टेशनला जमा केला ही पूर्ण घटना क्रम स्वतःच्या डोळ्यांनी पहिली असून जप्त केलेला मुद्देमाल याची परस्पर संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता विक्री करून विल्हेवाट लावली असल्याचा आरोप करत सदर कारवाई मध्ये अधिकारी व कर्मचारी यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे उपस्थित होते.  सर्व पुरावे योग्य वेळी सादर करणार