एका कर्णबधिर दिव्यांगाला राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या आशीर्वादाने व प्रहारच्या मध्यमातून मिळाला श्रवण यंत्रांचा आधार.

अहमदनगर येथील दिव्यांग सदा अन्ना नक्का हे अतिशय गरिब असुन ते मेडिकल एजेन्सीमधे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्याना ऐकू येत नसल्याने त्यांना अडचण निर्माण झाली होती व त्यांच्याकडे श्रवण यंत्र घेण्यासाठी पैसे देखील नव्हते त्यामुळे त्यांनी  प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे व जिल्हा सचिव हमीद शेख यांच्याशी संपर्क साधून त्यानी श्रवण यंत्र मशिनची मागणी केली असता  एका गरिब दिव्यांगास श्रवण यंत्र सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने  देण्याचा निर्णय यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन अहमदनगर जिल्हायांच्या वतीने   घेतला व त्यांना कानाची श्रवण यंत्र मशीन उपलब्ध करून देण्यात आली.  यावेळी जिल्हा सहसचिव किशोर सूर्यवंशी, जिल्हा संघटक राजेंद्र पोकळे, शहर उपाध्यक्ष संदेश रपारिया, तालुका अध्यक्ष संजय पुंड, पोपट शेळके आदी उपस्तीत होते.
प्रहार संघटनेचे लक्ष्मणराव पोकळे व हमीद शेख म्हणाले की एका कर्णबधिर दिव्यांगाला  राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु  यांच्या आशीर्वादाने व प्रहारच्या मध्यमातून  मिळाला  श्रवण यंत्राचा आधार. प्रहारच्या माध्यमातून व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडु यांच्या आशीर्वादाने प्रत्येक गरजू दिव्यांगाना त्याचा हक्क व अधिकार मिळुन देण्याचा प्रयत्न करणार तसेच दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने न्याय मिळवून देण्याचे कार्य चालू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.