सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड.

महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे .सिंधुताई ७३ वर्षांच्या होत्या , काल 4 जानेवारी रोजी रात्री  8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले , महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते , त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते , काल अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले .त्यांचा निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.