सोमवार पर्यंत कामावर आल्यास निलंबन मागे – परिवहन मंत्री अनिल परब

संपावर असलेल्या एस टी कामगारांनी सोमवारपर्यंत हजर व्हावे , जे कर्मचारी निलंबित असतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल अन्यथा सोमवार नंतर कारवाई तीव्र करण्यात येईल असा इशारा परिवहन मंत्री ऍड अनिल परब यांनी शुक्रवारी दिला . एस टी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा या मागणी साठी हा संप सुरु आहे . यासंदर्भात अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाचा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातील कर्मचारी व आगारात उभ्या असलेल्या गाड्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते .