अनिल राठोड यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी…

अहमदनगर:मेट्रो न्यूज 

शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड  शहरातील  नागरिकांच्या मनावर पंचवीस वर्ष अधिराज्य करणारे , यांची जयंती शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्व. राठोड यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत दीनदुबळ्यांचे नेतृत्व केले. राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वसामान्यांची सेवा केली. त्यांचे कार्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी करणारे आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप करून शिवसेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांची जयंती साजरी  करण्यात आली . तसेच चितळ रोड शिवालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते . यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर भगवान फुलसौंदर, बाबुशेट टायरवाले, विक्रम राठोड, आनंदराव शेळके, रविंद्र लालबोंद्रे, सुनिल लालबोंद्रे, दामोधर भालसिंग, संजय छजलाणी, विनोद शिरसाठ, विशाल शितोळे, प्रल्हाद जोशी, राज कोंडके, अभिषेक भोसले, सौरभ झिंजे, ओंकार शिंदे, कमलेश वाव्हळ, शुभम खराडे, भाऊ कांडेकर, पवन कुमटकर, गणेश कंठाळे, विजय चव्हाण, श्याम सोनवणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.