अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे उपोषण
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण
अहमदनगर : मेट्रो न्यूज
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.6 मार्च) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्यात आले. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या काही सहकारी कर्मचार्यांनी कुठलाही गुन्हा नोंद नसताना जाणीवपूर्वक अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी मनमानी पद्धतीने मारहाण करून पोलीस स्टेशनला आणले गेले होते. असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.तर पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत खातेदाराने तेथील आधिकारी, क्लार्कशी संगनमत करून चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर करत सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले.
या प्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती . मात्र या चेक घोटाळा प्रकरणात शाखाअधिकारी सदाशिव फरांडे हा व त्याला पाठीशी घालणारे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व चेअरमन शिवाजी तुकाराम व्यवहारे यांना जबाबदार धरण्यात आल्याचा अहवाल सहकार विभागाचे पारनेरचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी यांनी दिला असताना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे.
या उपोषणात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, पुरुषोत्तम शहाणे, विनायक गोस्वामी, प्रशांत ठुबे, बबन बर्डे, शमसुद्दिन सय्यद, पांडुरंग धरम, रतन खत्री, कोकाटे आदी सहभागी झाले होते.